याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग विलास मरसाळे, तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण चव्हाण, विस्तार अधिकारी शिक्षण विनोद मानकर, पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गणोदे, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रवीण पाचपोर आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पथकाने मधापुरी ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी फळबागेत लागवड केलेल्या सीताफळ वृक्षांची तसेच शहीद जवान प्रल्हाद भोलाजी साव क्रीडांगणांची पाहणी केली. स्थानिक जि.प. शाळा व नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र, संगणक प्रणाली, अंगणवाडी केंद्र, प्रा.आ. उपकेंद्र आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्ह्यास्तरीय तपासणी पथकाच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा याच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप ठाकरे यांचे हस्ते जिल्हास्तरीय ग्राम स्वच्छता अभियान पथकाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतबाबत सरपंच प्रदीप ठाकरे,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जि.प. शिक्षक यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन व आभार स. शिक्षक प्रवीण मुरळ यांनी मानले. यावेळी ग्रा.पं. सदस्य नितेश खलोरकर, आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जि.प. शिक्षक वर्ग, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: