लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी २४ हजार १0१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी पाच ठिकाणी सरळ लढत आहे, तर कोळासा येथे सात सदस्य अविरोध तर दोन जागा रिक्त असताना फक्त सरपंच पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रा.पं. जोगलखेड सरपंच पदासाठी चार तर सात सदस्य पदासाठी १७ उमेदवार, कारंजा (रमजानपूर) सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, बहादुरा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी तीन अविरोध आणि तीन जागा रिक्त तर एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात, टाकळी खोजबोळ सरपंच पदासाठी तीन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, मनारखेड सरपंच पदासाठी तीन तर नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, कळंबा बु. सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात, कळंबी (महागाव) सरपंच पदासाठी चार तर नऊ जागांसाठी दोन अविरोध व चार जागा रिक्त तर तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, हिंगणा निंबा सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी दोन अविरोध व पाच रिक्त, निंबी सरपंच व सहा सदस्य अविरोध आणि एक जागा रिक्त, भरतपूर सरपंच पदासाठी तीन तर नऊ सदस्यांसाठी तीन अविरोध आणि सहा जागांसाठी १२ उमेदवार सरळ लढतीत, कुपटा सरपंच पदासाठी पाच तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी ११ उमेदवार, सांगवी (जोमदेव) सरपंच पदासाठी दोन तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात, तामशी सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी चार अविरोध आणि तीन रिक्त तर केवळ सरपंच पदासाठी मतदान, बारलिंगा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार सरळ लढत, दधम सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, शेळद सरपंच पदासाठी पाच तर नऊ जागांसाठी चार अविरोध, पाच जागांसाठी ११ रिंगणात, सातरगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी चार अविरोध, तीन रिक्त तर केवळ सरपंचासाठी निवडणूक, वझेगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांपैकी दोन अविरोध, पाच जागांसाठी १३ उमेदवार, नागद सरपंच पदासाठी चार तर नऊपैकी चार अविरोध पाच जागांसाठी १0 उमेदवार, मोखा सरपंच पदासाठी तीन तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध, चार जागांसाठी आठ उमेदवार, हसनापूर सरपंच पदासाठी दोन सरळ लढत, सातपैकी सहा अविरोध एका जागेसाठी दोन उमेदवार, मोरगाव (सादीजन) सरपंच अविरोध तर ऊ सदस्यांसाठी सहा अविरोध तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, मोरझाडी सरपंच पदासाठी चार तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध चार सदस्यांसाठी नऊ उमेदवार रिंगणात, निमकर्दा सरपंच पदासाठी पाच तर नऊ सदस्यांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७३ केंद्राध्यक्ष व एकूण २२0 कर्मचारी आज मतदान केंद्रावर मतदारांकडून मतदान करून घेतील. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे, निवडणूक नायब तहसीलदार ए.एस. सोनवणे व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.व्ही. दुधे, जे.आर. तिवारी, योगेश कौटकर, अरुण मुंदडा, श्रीधर बोकडे, एम.एस. राऊत, प्रदीप चोरे तर सहा. निवडणूक अधिकारी डी.डी. मानकर, सुभाष ठाकरे, एस.वाय. उमाळे, ए.एस. साखरकर, आर. बी. सावदेकर, सुरेश पवार, प्रकाश हिरुळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पाच गटग्रामपंचायतींसाठी दूरचे मतदान केंद्र - पाच गटग्रामपंचायतींमध्ये शेळद, टाकळी निमकर्दा, जोगलखेड, हसनापूर व कुपटा या गावाला २ ते ३ गावे जोडली आहेत. निवडणूक केंद्र ग्रामपंचायत मुख्यालय (मतदान केंद्राचे अंतर) हे एक कि.मी.च्या आत असावे, असे असताना मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्राची सुविधा देण्यात आली नसल्याचे चित्र आहे. शेळद ग्रामपंचायतीमध्ये अकोला नाका हे अंतर पाच कि.मी. आहे. - टाकळी निमकर्दाला बोराळा, बोरवाकळी, मनाडी या गावाला मतदान केंद्र नाही. या तिन्ही गावांच्या मतदारांना टाकळी निमकर्दा येथे ३.५ कि.मी. अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. जोगलखेड, सोनगिरी, अडोशी, धानोरा या तिन्ही गावांच्या मतदारांना तीन कि.मी.पेक्षा जास्त अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. - याबाबत मतदार व उमेदवार राजकीय पक्षाने निवडणूक विभागाकडे ना तक्रार केली, ना सुचवले. निवडणूक विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पर्यायाने मतदारांना उमेदवारांच्या वाहनाचा सहारा घ्यावा लागणार आहे.