सुविधा उपलब्ध करून देण्याचे अधिकार्यांना निर्देशचोहोट्टा बाजार : अकोट-अकोला मार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन विश्रामगृहाची जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई हरिभाऊ वाघोडे यांनी रविवारी पाहणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व उद्घाटनाचे त्वरित नियोजन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिलेत.स्थानिक दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ ३५ लाख रुपये खर्च करून विश्रामगृहाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील दोन वर्षापासून ही इमारत धुळखात पडून आहे. याबाबत ह्यलोकमतह्णमधून वृत्त प्रकाशित होताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई हरिभाऊ वाघोडे यांनी या विश्रामगृहाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. (वार्ताहर)
आज लोकमतमध्ये बातमी पाहिली आणि चोहोट्टा बाजार येथील विश्रामगृहाची पाहणी केली. त्यात काही सुविधांचा अभाव, सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. लवकरच उद्घाटनही होईल. - संध्या वाघोडे, अध्यक्षा, जि. प. अकोला