अकोला: पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या सोयीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न स्वतंत्र विद्यापीठ देण्याची मागणी समोर आल्यानंतर तत्कालीन आघाडी शासनाने अनुकूलता दर्शवली होती. तथापि, हा मुद्दा मागे पडला असून, या अधिवेशनातही याबाबत ठोस निर्णय न झाल्याने सध्या तरी विभाजन होणे शक्य नसल्याचे संकेत आहेत.पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सात लाख हेक्टरवर धानाचे क्षेत्र आहे. धान पिकावर अपेक्षित संशोधन होत नसून, शेतकऱ्यांना उत्पादन, उत्पन्नात अपेक्षित बदल न झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा मुद्दा समोर आला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पुढाकार घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. याच अनुषंगाने शासनाने त्यावेळी विभाजनसंदर्भात समिती गठित करू न चालना दिली होती. तद्वतच राज्यातील महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्याचे ठरले होते. पूर्व विदर्भात विद्यापीठ व्हावे हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्याने, युती शासनाने स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरलू यांच्या अध्यक्षततेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यापूर्वी आघाडी शासनानेदेखील समिती नेमली होती. या समित्यांनी विभाजनासाठीचा पूरक अहवाल दिला होता. तथापि, केवळ तीन ते चार जिल्ह्यांसाठी विद्यापीठ कसे, असा मुद्दा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू ंसह शास्त्रज्ञांनी उपस्थित केला होता. एका धान पिकासाठी कृषी विद्यापीठ निर्मिती करणे, संयुक्तिक नसल्याचे या सर्वांचे म्हणणे होते. भौगालिकदृष्ट्या दुसºया विद्यापीठाची गरजच नाही, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले होते.दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार यांनी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकºयांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात करावी, अशी मागणी लावून धरली. या विषयावर चर्चा घडवून आणली. या संदर्भात लवकरच विदर्भातील आमदारांची बैठक घेतली जाईल, अशी असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. त्यामुळे तूर्तास तरी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा टळला आहे.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकºयांकडे कृषी विद्यापीठाचे पूर्णत: लक्ष असून, धानावर संशोधन करण्यासाठी नुकतीच भरीव तरतूद करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील शेतकरी हा आपलाच असल्याने विद्यापीठ धान उत्पादकांसोबत आहे.- डॉ. व्ही.एम.भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.