........................................
अकोला तालुक्यात ५०२
व्यक्तींचे घेतले स्वॅब नमुने!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला तालुक्यात व्यापारी, दुकानदार व कामगारांचे स्वॅब नमुने घेण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी बोरगावमंजूसह तालुक्यातील सात गावांमध्ये ५०२ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सांगितले.
..............................................
घरकूल कामांचा आढावा
अकोला : महाआवास योजनेंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय घरकूल कामांचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगव्दारे घेतला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील घरकूल कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील मंजूर घरकुलांच्या तुलनेत पूर्ण झालेली कामे व घरकूल कामांतील अडचणी यासंदर्भात ग्रामविकास मंत्र्यांनी माहिती घेतली.
........................................................
रस्त्यांवर शुकशुकाट!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजतापासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट जाणवत होता. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर दुकानेही बंद करण्यात आली होती.
..........................................