..............................................
पीक कर्ज नूतनीकरणाचे काम सुरू!
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये गतवर्षी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून नवीन कर्ज वाटप करण्याचे काम जिल्ह्यात बँकांमार्फत सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया यांनी सोमवारी सांगितले.
.............................................
शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपडेट’ करण्याचे निर्देश!
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यांमधील दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून, याद्या अद्ययावत (अपडेट) करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.
..................................................
‘सीईओं’नी घेतला थकीत पाणीपट्टीचा आढावा!
अकोला: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी यासंदर्भात माहिती घेतली.
.....................................................
‘एसडीओं’नी घेतली बैठक
अकोला: अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार यांनी सोमवारी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने महसूल कर वसुलीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
.....................................