यू. एल. घुले यांनी स्वीकारला गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार
पातूर : येथील शिक्षण विभागात कार्यरत असलेले गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ गत दीड महिन्यांपासून दीर्घ रजेवर असल्यामुळे कामे खोळंबली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदन देऊन गटशिक्षणाधिकारी पद भरण्याची मागणी केली होती. अखेर सहायक प्रशासन अधिकारी यू.एल. घुले यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
------------------------
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात!
बोरगाव मंजू : दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याचे चित्र आहे. अळींच्या बंदोबस्तासाठी शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहेत.
-------------------------
बार्शिटाकळी तालुक्यात पोलीसपाटील पदे रिक्त
सायखेड: तालुक्यात अनेक गावांमध्ये पोलीसपाटील पद रिक्त असून, नागरिकांचे कामे खोळंबली आहे. तसेच तालुक्यातील काही ठिकाणी एकाच पोलीसपाटलांकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने कागदपत्रांसाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
--------------------------------------
वाडेगाव शहरात घाणीचे साम्राज्य
वाडेगाव : येथील मुख्य चौकात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. बसस्थानकानजीक कचऱ्याचे ढीग जमा होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकात मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असल्याने प्रवाशांसह वाहक चालकाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
-----------------------------
दिग्रस बु. येथील बसथांब्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी
दिग्रस बु. : येथील बसथांब्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील बस थांबा हा चौरस रस्त्यावर असल्याने चारही बाजूने वाहनांची रेलचेल सुरू राहते. त्यामुळे बसथांबा चौकात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात चारही बाजूने गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.