अकोला, दि. ८- इयत्ता दहावी आणि बारावीचा पेपर सोडवण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांंना शहर वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली जात आहे. हा प्रकार ऐन पेपरच्या दिवशी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांंसह त्यांचे पालक कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर संपेपर्यंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली. इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांंची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. चांगल्या टक्केवारीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात. विद्यार्थ्यांंसोबतच पालकांचीही धांदल उडाल्याचे पहावयास मिळते. अशावेळी ऐन सकाळी-सकाळी पेपर सोडवण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांंची वाहने अडवून त्यांच्याकडून दुचाकी चालवण्याचा परवाना तसेच वाहनांच्या कागदपत्रांची मागणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे. या प्रक्रियेला १५ ते २0 मिनिटांचा अवधी लागत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी जीवाचे रान करतात. यादरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या असंख्य पालकांनी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे बुधवारी धाव घेतली. पोलिसांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे पेपर सोडवण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांंच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे किमान परीक्षा होईपर्यंंत पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांंकडून वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रांची तपासणी न करण्याची मागणी त्यांनी आ. बाजोरियांकडे लावून धरली. परीक्षेचा काळ व विद्यार्थ्यांंची मानसिकता लक्षात घेता परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना आ. बाजोरिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली.पोलीस प्रशासनाने दिला होकार!आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांंंचे पेपर संपेपर्यंंंत त्यांच्या वाहनांची तपासणी न करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांंंनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. काही पालकांनी तक्रारी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंची वाहने तपासली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेऊन परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंंच्या वाहन तपासणीला शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.-प्रमोद काळे, शहर वाहतूक शाखाप्रमुख
परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2017 3:33 AM