अकाेला : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घाेंगावत असतानाच शहरात तापाची साथ आली आहे. ताप, सर्दी, खाेकला, असे आजार उद्भवले आहेत. पावसाळ्यात होणारे सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल, तर पाणी पिताना काळजी घेतलेलीच बरी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
उलटी, टायफाॅइड
कॉलरा, गॅस्ट्रोव्हायरल
इन्फेक्शन, कावीळ
लक्षणे
१) उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे ही कावीळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना आजाराची लक्षणे कायम राहतात.
२) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणे दिसू लागतात.
३) टायफाॅइड दूषित पाण्यामुळे होतो. रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते, उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.
...अशा प्रकारे घ्यावी काळजी
पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुऊन त्यात पाणी भरावे.
पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.
पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावेत.
बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.
नागरिकांनी पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजार दूर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अकाेलेकरांना प्रतिव्यक्ती १०० लिटर पाणी
अकाेला शहरातील ५ लाख लोकसंख्येला दररोज पाणीपुरवठ्याच्या मानकानुसार प्रतिव्यक्तीला दररोज १०० लिटर पाणी महापालिका देते. शहराला महान प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.