चंद्रशेखर ठाकरे * पिंजर प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर सरकारचा शेतकर्यांवर भरवसा नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रारंभीपासूनच तूर खरेदीमध्ये व्यापार्यांचेच ‘चांगभले’ झाल्याची सर्वत्र चर्चा असून, अनेक ठिकाणी तूर खरेदीत मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे ‘ब्रेक’नंतर आता पुन्हा सुरू केलेल्या तूर खरेदीत पारदर्शकता आणण्याचे शासनाकडून निर्देश असल्याचे प्रशासन सांगत असून, त्या धर्तीवर कृ षी विभाग, महसूल विभागासह अनेकांवर शेतकर्यांच्या घरी जाऊन तुरीचा पंचनामा करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिल्याची माहिती आहे.२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृ षी विभागाला पंचनामे करायचे पत्र दिले. त्यानुसार बाश्रीटाकळी कृ षी विभागाच्या कृ षी सहायकांनी पंचनामे सुरू केले असून, यामुळे शेतकर्यांच्या विश्वासार्हतेवर सरकार प्रश्नचिन्ह निर्माण करीत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे साध्याभोळय़ा शेतकर्यांचा फायदा घेत ‘टोकन’ मिळविणार्या व्यापार्यांची मात्र झोप उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, बाश्रीटाकळी तूर खरेदी केंद्रावर ७ फेब्रुवारी २0१७ पासून तर ७ जून २0१७ पर्यंत सुमारे ६४ हजार ६१६ क्विंटल खरेदी झाली असून, ४३ हजार ९२0 क्विंटल खरेदी बाकी असल्याचे समजते. त्यामध्ये २६ जूनपासून २ जुलैपर्यंत ३ हजार २१५ क्विंटलची खरेदी केली आहे.
*जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २५ जून रोजी मिळालेल्या यादीनुसार कृ षी सहायक तुरीचे पंचनामे करीत असून, आतापर्यं त २६ शेतकर्यांच्या घरी जाऊन पंचनामे केले. पुन्हा सुमारे ७00 शेतकर्यांची यादी आम्हास प्राप्त झाली आहे. तेसुद्धा त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करू.- सुरेश अवनाते,तालुका कृ षी अधिकारी, बाश्रीटाकळी.