अकोला: पीक कर्जाचे पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्यांना नवीन कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे सांगत, पीक कर्जासाठी शेतकर्यांना हेलपाटे सहन करावे लागणार नाहीत, याबाबत गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश शासनाच्या कामगार खात्याचे प्रधान सचिव तथा जिल्हय़ाचे पालक सचिव बलवंत सिंह यांनी गुरुवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गतवर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँकांनी कर्जदार शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकर्यांना फेरफार आणि ह्यसर्च रिपोर्टह्ण सादर करण्याची गरज नसून, केवळ सात-बारा सादर करणार्या शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालक सचिवांनी दिल्या. कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कर्जासाठी शेतकर्यांना हेलपाटे सहन करावे लागणार नाहीत, याबाबत दक्षता घेऊन शेतकर्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बलदेव सिंह यांनी दिले. कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंत बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हय़ात झालेला पाऊस, बियाणे-खतांचा पुरवठा, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध निधी आणि झालेला खर्च, शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण,जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हय़ातील कामे, पीक कर्जाचे पुनर्गठन व कर्ज वाटप, विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची रिक्त पदे यासंदर्भात पालक सचिवांनी आढावा घेतला. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मालपुरे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
पीक कर्जासाठी शेतक-यांना हेलपाटे देऊ नका!
By admin | Published: June 26, 2015 1:50 AM