संतोष येलकर /अकोलाशेतीशी निगडित कर्जाची शेतकर्यांकडून सक्तीने वसुली करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील बँक अधिकार्यांना दिले.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक हातून गेले तसेच दुबार-तिबार पेरणी करूनही सोयाबीन उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी ५0 किलो ते एक क्विंटलच्यावर झाले नाही. कपाशीचे उत्पादनही बुडाले असून, पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने रब्बी पिकांचेही खरे नाही. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४१ पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गत १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केले तसेच ५0 पैशांपेक्षा पैसेवारी कमी असल्याने, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यापारी बँकांच्या अधिकार्यांची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. टंचाई परिस्थितीत शेतीशी निगडित शेतकर्यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमबजावणी करून,शेतकर्यांकडून सक्तीने कर्ज वसुली करू नये, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी बँकांच्या अधिकार्यांना दिले. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड यांच्यासह विविध ३५ बँकांचे अधिकारी उपस्थित होते. टंचाई परिस्थितीत शेतकर्यांकडील कर्ज वसुलीस शासन निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून, शेतकर्यांकडून कर्जवसुलीसाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले. याशिवाय शेतकर्यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचे रूपांतरण करून, कर्ज वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकर्यांना वाटप करण्यात आलेले कर्ज!हंगाम शेतकरी रक्कमखरीप १,११,४३३ ७0७ कोटी ३८ लाखरब्बी ४४७ ४ कोटी 0३ लाख....................................एकूण १,११,८८0 ७११ कोटी ४१ लाख
शेतक-यांकडून कर्जवसुली सक्तीने करु नका!
By admin | Published: December 29, 2014 1:57 AM