लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या थेट शाळेवर न करता जिल्हा परिषदेच्या ठिकाणी करण्यात झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेवर पदस्थापना देण्यात आली. आंतरजिल्हा बदलीने थेट शाळा न देता फक्त जिल्हा बदल करण्यात आला. त्यामुळे ती बदली प्रक्रिया यशस्वी ठरली. त्याचवेळी जिल्हय़ांतर्गत बदल्या करताना राज्य स्तरावरून करण्यात आल्या. हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था विश्वासार्ह नाहीत, जिल्हा परिषदेतील संवैधानिक पदाधिकारी व सक्षम प्रशासकीय अधिकार्यांची यंत्रणा कुचकामी आहे का, असा आरोपही निवेदनात करण्यात आला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार गोठवण्याचाही हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. संवर्ग २ मध्ये बदली अर्ज भरताना ३0 किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या (जोडीदार कोणत्याही खात्यात सेवेत असल्यास) शिक्षकांनी अर्ज केला आहे. त्यामध्ये ३0 किमीच्या अंतरात पती-पत्नी असलेल्यांना खो बसला आहे. फक्त जिल्हा परिषद शिक्षक असल्यास त्यांनाच अर्ज सादर करता येणार, असे या २७ फेब्रुवारीच्याच्या शासन निर्णयात नमूद असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्याचवेळी जे पती-पत्नी ३0 किलोमीटरच्या आत असलेल्यांची बदली झाल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागत आहे. संवर्ग १ मध्ये बदली किंवा त्यातून सूट घेण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज केला आहे. तसेच गंभीर आजारांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह शारीरिक तपासणी जे. जे. रुग्णालय, मुंबई वैद्यकीय बोर्डाकडून करावी, त्यांचे प्रमाणपत्र खोटे निघाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिक्षकांनी केली आहे. संवर्ग दोनमध्ये ३५ किमीपेक्षा अंतर कमी असताना ते जास्त दाखवून बदली अर्ज करण्यात आला, त्याची पडताळणी करून कारवाई करावी, जिल्हय़ांतर्गत शिक्षक बदलीबाबतच्या संदिग्ध शासन निणर्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी व दिवाळीच्या सुट्या विनाकारण वाया जात आहेत, या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होत असून, त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीचे शशिकांत गायकवाड, संजय भाकरे, नामदेव फाले, जव्वाद हुसेन, प्रकाश चतरकर, संतोष महल्ले, केशव मालोकार विजय भोरे, देवानंद मोरे, रजनीश ठाकरे, महादेव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदनातून केली आहे.
शासनाचा जिल्हा परिषदांवर भरवसा नाही का..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:44 AM
अकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.
ठळक मुद्देशिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला सवाल