लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संकटाच्या काळात मुबलक साधनांची उपलब्धता नसली तरी, अनेकदा जुगाड टेक्निकच्या साहाय्याने पर्यायी मार्ग काढला जातो. अशीच काहीशी शक्कल लढवून जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी सध्या कोरोनापासून स्वत:ची सुरक्षा करताना पाहावयास मिळत आहेत.सध्या सर्वत्र कोरोनाचा धोका वाढला आहे. अशातच जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोल्यातीलच नाही, तर वाशिम, बुलडाण्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील गर्भवती प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथे गर्भवतींसह त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांचीही नेहमीच गर्दी असते. त्याचा धोका डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही आहे. यापासून सुरक्षेसाठी शासनाकडे ‘पीपीई’ किटची मागणी करण्यात आली होती; परंतु अद्यापही किट आली नाही. आतापर्यंत एचआयव्ही किटचा उपयोग करण्यात आला; पण त्याही संपल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी जुगाड टेक्निकचा वापर करून स्वत:ची सुरक्षा करीत आहेत. ‘पीपीई’ किट म्हणून येथील कर्मचाºयांना रेनकोट, गॉगल्स, कापडी गाऊनचाही उपयोग करावा लागत आहे. एन-९५ ऐवजी सर्जिकल मास्कचा उपयोग करावा लागत आहे. शिवाय, कर्मचाºयांनी स्वत:च प्लास्टिकपासून १०० पेक्षा जास्त ‘फेस शील्ड’ तयार केल्या असून, त्याचाही उपयोग केला जात आहे.
‘हाय रिस्क’ भागातील गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डजिल्ह्यातील ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच वाशिम, बुलडाण्यासह इतर जिल्ह्यातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाय केले जात आहेत. ‘पीपीई’ किट नसली तरी, पर्यायी व्यवस्था म्हणून इतर साधनांचा उपयोग करण्यात येत आहे. शिवाय वाशिम, बुलडाण्यासह इतर जिल्ह्यांतून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केली आहे.-डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.