शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; अकोला जिल्ह्यातील २५० वर रुग्णालये राहिली बंद!

By atul.jaiswal | Published: July 29, 2018 1:18 PM

अकोला : जिल्ह्यातील २५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले.

ठळक मुद्देएकूणच ‘आयएमए’चे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप पाळला आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले होते.

अकोला : सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयकाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) झेंड्याखाली देशभरातील डॉक्टरांनी शनिवार, २८ जुलै रोजी ‘काम बंद’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनात अकोला ‘आयएमए’नेही सहभाग घेतला. जिल्ह्यातील २५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती. अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले होते.आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘आयएमए’ने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अटी हे विधेयक मंजूर झाल्यास रद्द होणार आहेत. महाविद्यालयांचा मनमानी कारभार वाढून बोगस पदवी प्रदान डॉक्टरांची संख्या वाढणार, नियम भंग करणाºया डॉक्टरांना ५ कोटी ते १०० कोटी दंडाची तरतूद असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, वैद्यकीय शिक्षण महागडे होऊन त्यावर धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. सध्याची राज्य वैद्यकीय परिषदांची स्वायत्तता संपुष्टात येईल, विद्यापीठे नावापुरती उरतील. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोयीचे आहे. यामुळे ‘आयएमए’ या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे.एकूणच ‘आयएमए’चे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप पाळला आहे. संध्याकाळी ६ वाजतापासून पुढे सर्व डॉक्टरांकडून नियमितपणे बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती ‘आयएमए’ सचिव डॉ. रणजित देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रुग्णालयांमध्ये शुकशुकाटसकाळी ९ वाजतापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत डॉक्टरांनी संप पुकारल्याने बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) बंद राहिली. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी बंद ठेवली. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.‘आयएमए’ सभासदांची निषेध सभास्थानिक ‘आयएमए’ हॉलमध्ये दुपारी आयएमए सभासदांची बैठक घेण्यात आली. यावेळी सचिव डॉ.रणजित देशमुख, डॉ.अजयसिंग चौहान, डॉ.नीलेश कोरडे, डॉ. के.के.अग्रवाल, डॉ.आशिष डेहनकर, डॉ. भूषण मापारी, डॉ. रणजित सपकाळ, डॉ.अशोक राजवाडे, डॉ.प्रशांत पोफळकर, डॉ. शिरीष थोरात, डॉ. राजेश काटे, डॉ.शिरीष डेहनकर, डॉ. हरीश अग्रवाल, डॉ. विवेक देशपांडे, डॉ.जुगल चिराणिया, डॉ.ज्योती रेंगे, डॉ. प्रज्योत गर्गे, डॉ. प्रमोद लढ्ढा, डॉ.अविनाश पाटील, डॉ. नितीन उपाध्ये, डॉ.ओ.के.रुहाटिया, डॉ.सुभाष कोरपे, डॉ.सुनंदा केळकर, डॉ.अजय सिंगी, डॉ. बी.सी.विरवाणी आदी उपस्थित होते.अंजनगाव तालुक्यातील रुग्णाला उपचाराविना जावे लागले परत!अकोला : सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयकास विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यातील रुग्णालये शनिवारी बंद राहिली. त्याचा फटका सामान्य रुग्णांना बसला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील कुंभारगाव येथील एका गंभीर रुग्णाला उपचाराविनाच परत जावे लागल्याचा प्रकार समोर आला.डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनातून अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास वगळण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचा दावाही ‘आयएमए’कडून करण्यात आला होता. अंजनगाव तालुक्यातील कुंभारगाव येथील बाळकृष्ण गुजर हे गत आठवड्यात डुकराच्या हल्ल्यात जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील एका खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. शनिवारी त्यांची पत्नी व मुलाने त्यांना पुन्हा उपचारासाठी इस्पितळात आणले. परंतु, डॉक्टरांचा संप असल्याचे सांगत इस्पितळातील कर्मचाºयांनी परत जाण्यास सांगितल्याचा आरोप बाळकृष्ण गुजर यांच्या पत्नीने केला. यासंदर्भात, संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता, असा कोणताही रुग्ण आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल