-आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत चालला असताना दुसरीकडे गुलजारपुरा भागातील एका ७६ वर्षीय वयोवृद्ध महिलेला नातेवाइकांनी घराच्या बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘लॉकडाउन’च्या काळात घरातील कर्त्या पुरुषांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने संबंधित वृद्ध महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे या वयोवृद्ध महिलेवर घर शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.कोरोनामुळे सद्यस्थितीमध्ये शहरातील चारही झोनमधील विविध प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अशा संकटाच्या समयी गरजू व निराधार लोकांसाठी अकोलेकर धावून गेले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी संयमाने व एकदिलाने मुकाबला करण्याची गरज असताना ‘लॉकडाउन’च्या काळात रोजगार बंद झाल्याने घरातील वयोवृद्ध नागरिकांना घराबाहेर काढून दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जुने शहरातील गुलजारपुरा परिसरात आपल्या नातेवाइकांकडे आश्रित म्हणून राहणाऱ्या ७६ वर्षीय मरियमबी यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यांचा ४५ वर्षीय रिक्षा चालक मुलगाही बेघर आहे. आई एका नातेवाइकाकडे आश्रयाला होती. त्यामुळे त्याच्यावर आईचा भार नव्हता; मात्र आता आईसुद्धा बेघर झालयाने या दोघा माय-लेकांवर उघड्यावर राहण्याची परिस्थिती ओढवली आहे. यादरम्यान त्यांनी भाडेतत्त्वावर घराचा शोध सुरू केला असला तरी कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे त्यांना कोणी घर देत नसल्याची भावना त्यांनी जड अंत:करणाने व्यक्त केली.
मुलगा रिक्षा चालक; व्यवसाय ठप्पमरियमबी यांचा ४५ वर्षीय मुलगा करीम खान रिक्षा चालवून पोटाची खळगी भरतो. गत २३ मार्चपासून टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे व्यवसाय ठप्प पडल्याचे करीम खान याने सांगितले. शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी दोघे माय-लेक राहतात. दानशूर व्यक्तींनी जेवण आणून दिले तर जेवतात, नाहीतर पाणी पिऊन पोटाची आग शांत करतात.मनपाच्या बेघर निवाºयाकडे फिरविली पाठमनपाच्यावतीने शहरात उघड्यावर राहणाºया बेघर व्यक्तींसाठी जिल्हा सत्र न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा येथे तसेच अकोट फैल पोलीस स्टेशनलगत मनपा मराठी मुलांची शाळा येथे निवारा उघडण्यात आला आहे. या बेघर निवाºयात आम्ही गेलो होतो. आता पुन्हा जाणार नाही, असे सांगत मनपाच्या निवाºयाबद्दल फार काही बोलण्यास मरियमबी यांनी नकार दिला.