वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस - एकही डोस न घेतलेले
१८ ते ४४ - १,२४,४२२ - १०,६४६ - ७,२३,१०४
४५ ते ५९ - १,३१,५५२ - ५६,५५७ - २,७६,४३६
६० वर्षापेक्षा जास्त - ९९,४१२ -४२,६०२ - ९७,९७६
शासकीय लसीकरण केंद्रात १०,०००
खासगीत सुमारे ३००० डोस
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत दर आठवड्यात तीन ते चार दिवसांआड लसीचा पुरवठा केला जातो. यामध्ये जिल्ह्याला कधी १०, तर कधी २० हजार डोस प्राप्त होतात, मात्र प्राप्त लसीचा साठा हा केवळ दोन किंवा तीन दिवस पुरेल एवढाच असतो.
तुलनेने खासगी लसीकरण केंद्रामध्ये लसीचा उपलब्ध साठा कमी असल्याची माहिती आहे. सुमारे ३ हजार डोस खासगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असल्याची सूत्रांची माहिती आहे; मात्र या ठिकाणी लस घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने तुटवडा जाणवत नसल्याचे चित्र दिसून येते.
लसीकरणाचा आकडा ५ लाखावर
जिल्ह्यात लसीकरणाचा आकडा ५ लाखावर पोहोचला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईच्या दृष्टिकोनातून ही आकडेवारी दिलासा देणारी आहे; मात्र अजूनही अनेकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. त्यामुळे चिंता कायम आहे. कोविड लसीकरणाविषयी अजूनही नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.
जिल्ह्यात कोविड लसीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. मध्यंतरी काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने त्या केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते; मात्र लस उपलब्ध होताच लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लस घेण्यासाठी नागरिकांची खासगीच्या तुलनेत शासकीय लसीकरण केंद्रांला पसंती असल्याचे दिसून येते.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम, अकोला