अकोला: सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात असला, तरी बाजारातून भाजीपाला आणताना अन् त्याचे सेवन करताना अनेक जण सवयीप्रमाणे निष्काळजी बाळगतात; पण असे करताना आपण कोरोनाचे वाहक तर बनत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि फळं खाताना ते योग्य प्रकारे स्वच्छ करूनच खावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.काय काळजी घ्यावी...विक्रेत्यांनी ही काळजी घ्यावी
- स्वच्छ ठिकाणीच भाजीपाला विक्री करावी.
- भाजीपाला नियमित स्वच्छ ठेवावा.
- स्वत:चे हात नियमित धुवावेत.
- तोंडाला हात लावणे टाळावे.
- सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास भाजीपाला विक्री टाळावी.
- दवाखान्यात जाऊन औषधोपचार करावा. बरे झाल्यावरच व्यवसाय पुन्हा सुरू करावा.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- स्वच्छता असेल तरच भाजीपाला खरेदी करावा.
- भाजीपाला किंवा फळांचे सेवन करण्यापूर्वी ते स्वच्छ करावे.
- कोमट पाण्यात मीठ टाकून ते स्वच्छ धुवावेत.
- शक्यतोवर कच्चे अन्न खाणे टाळावे.
- मांसाहाराचे सेवन करताना ते पूर्ण शिजवूनच घ्यावे.
असा करा स्वत:चा बचाव
- वारंवार हात स्वच्छ धुवावेत.
- विशेषत: जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवावेत.
- हस्तांदोलन टाळावे.
- डोळे, नाक व तोंडाला हातांचा स्पर्श टाळावा.
तंदुरुस्त राहण्यासाठी हे करा सेवन...
- सर्वच प्रकारच्या पालेभाज्या
- विशेषत: ऋतुमानानुसार बाजारात आलेली फळं आणि पालेभाज्या.
- ‘क’- जीवनसत्त्व असणारी फळे
‘कोरोना’ हा विषाणू एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे कोरोनाचे वाहक बनू नका. बाजारात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, कुठलेही अन्न चांगले स्वच्छ करून आणि शिजवूनच त्याचे सेवन करावे.- डॉ. मीना शिवाल, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अकोट.