अकाेला : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी हाेत आहेत, त्यामुळे आम्हाला भीक नकाे हक्काचा भाव हवा,
सर्वच पिकांना खर्चाच्या आधारे मूल्य मिळावे, याप्रमुख मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले.
भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर धाेत्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदाेलनामध्ये जिल्हा मंत्री, गजानन डाहाके, प्रांत सदस्य पांडुरंगजी गायकी, शहराध्यक्ष राजू वानखडे, उज्ज्वल ठाकरे, डाॅ. सुभाष देशपांडे, सुभाष राऊत, रामेश्वर खाडे, राहुल महानकर, समाधान गायकवाड यांचेसह शेतकरी सहभागी झाले हाेते. बेभरवशाच्या पावसामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न मात्र कमी हाेत आहे. त्यातही शेतमालाच्या भावाबाबत सातत्याने सरकारचे धाेरण बदलते असल्याने शेतकऱ्यांचे मरण हाेत आहे, असा आराेप करून किसान संघाने हक्काचा भाव द्या, अशी मागणी केली आहे.