कमला नगरमध्ये तुंबले सांडपाणी
अकाेला: प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या कमला नगरमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच मुख्य कमानीच्या बाजूला खासगी भूखंडात परिसरातील सांडपाणी साचले आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून पर्र्यायी उपाययाेजना केली जात नसल्याने स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
महामार्गाचे काम संथगतीने
अकाेला: शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या रूंदीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरु असले तरी संथगतीमुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. निमवाडी लक्झरी बस स्टॅन्ड, वाशिम बायपास चाैक, नवीन किराणा बाजार याठिकाणी अर्धवट रस्ता असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत.
नाल्यात जलकुंभी;डासांची पैदास
अकाेला:जुने शहरातील हरिहरपेठस्थित दशेहरा नगरला जाेडणाऱ्या मुख्य नाल्याची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाइ न केल्यामुळे त्यामध्ये माेठ्या प्रमाणात जलकुंभी निर्माण झाली आहे. यामुळे घाण सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास झाली असून इदगाह नजिक राहणाऱ्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे.
नाले सफाइकडे मनपाची पाठ
अकाेला: डाबकी राेडवरील सरस्वती किराणा शाॅपसमाेरचा नाला घाणीने तुडूंब साचला आहे. या नाल्याच्या साफसफाइकडे प्रभाग क्रमांक १० मधील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे मनपाचे सफाइ कर्मचारीही फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
अनावश्यक गतीराेधक हटवले!
अकाेला: जयहिंद चाैकातून राेकडाेबा मंदिर ते श्रीवास्तव चाैकाकडे जाणाऱ्या अरूंद गल्लीत चांदवडकर ज्वेलर्ससमाेर अनावश्यक गतीराेधक बसविण्यात आले हाेते. यामुळे दुचाकीचालकांना मनस्ताप सहन करावा लागत हाेता. प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी सदर गतिराेधक हटवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सिटी काेतवालीसमाेर ऑटाे चालकांची मनमानी
अकाेला: शहरातील ऑटाे चालकांना पाेलिस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सिटी काेतवाली समाेर पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाे चालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते. यामुळे वाहतुकीची माेठ्या प्रमाणात काेंडी निर्माण हाेत असली तरी पाेलिसांकडून काेणतीही कारवाइ केली जात नाही.
पथदिवे नादुरूस्त;मनपाचे दुर्लक्ष
अकाेला: मनपा प्रशासन असाे वा सत्ताधारी पक्षाकडून शहरातील दुर्लक्षीत भाग म्हणून प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव परिसराकडे पाहिल्या जाते. या भागात मुस्लीम कब्रस्तान ते शिलाेडा मार्गालगतच्या मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये अद्यापही पथदिव्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने महिला व लहान मुलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.