शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:17 AM

अकाेला : गृहकर्जासह, व्यावसायिक कर्ज आणि आपण ऑनलाइन सर्च केलेल्या विविध वेबसाइवर आपले प्राेफाइल जाताच संबंधित कंपन्यांकडून तसेच ऑनलाइन ...

अकाेला : गृहकर्जासह, व्यावसायिक कर्ज आणि आपण ऑनलाइन सर्च केलेल्या विविध वेबसाइवर आपले प्राेफाइल जाताच संबंधित कंपन्यांकडून तसेच ऑनलाइन चाेरट्यांकडून तशा प्रकारचे ॲप डाऊनलाेड करण्यासाठी विविध लिंक तसेच ॲपची माहिती आपाेआपच तुमच्या माेबाइलवर देण्यात येते. अत्यंत कमी व्याजदर आणि नाे प्राेसेसिंग चार्जेस अशा प्रकारचे आमिष दाखवून तुमची संपूर्ण माहिती गाेळा करून तुमच्याच बँक खात्यातील रक्कम साफ करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे ॲप डाऊनलाेड करताना सावधानी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. काेराेनाचे संकट प्रचंड वाढल्यानंतर प्रत्येकाचा ऑनलाइनकडे कल वाढला आहे. अनेक जण बँकिंग व्यवहारही आता ऑनलाइन पद्धतीने करीत आहेत. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित असले तरी आता हॅकर्सनी नवीन फंडा शाेधत तुम्हीच सर्च केलेल्या विविध वेबसाइटच्या माध्यमातून कमी टक्क्याचे व्याजदर आकारण्यात येत असलेले कर्ज देण्याचे तसेच विविध आमिष देऊन तुमच्या बँक खात्यातील रक्कम पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. अकाेल्यातील आदर्श काॅलनी येथील एका युवतीला व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली ७० हजार रुपयांनी अशाच प्रकारे गंडविण्यात आले असून या प्रकरणात खदान पाेलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ॲप डाऊनलाेड करताना याेग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन सायबर पाेलिसांनी केेले आहे़

ॲप डाऊनलाेड करताच बँक खाते साफ

कमी मेगाबाइट्स असलेले विविध ॲप हे बनावट असतात. तुम्ही एखादे ओरिजीनल ॲप डाऊनलाेड करीत असताना तशाच प्रकारचे बनावट ॲप तुमच्या वाॅलवर येईल. तुम्ही हे बनावट ॲप डाऊनलाेड करताच तुमची संपूर्ण माहिती समाेरील व्यक्तीला जाईल आणि ताे तुमच्या बँक खात्यातील रक्कम साफ करेल. त्यामुळे संबंधित बँक तसेच फायनान्स कंपनीचे अधिकृत ॲपच डाऊनलाेड करावे अन्यथा तुमची फसवणूक निश्चित हाेईल़

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता

रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवकाने विमान तिकीट रद्द केल्यानंतर पैसे परत मिळविण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यानंतर त्यांना एक ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले. ग्राहकाने ॲप डाऊनलाेड केल्यानंतर त्यांना पैसे परत मिळविण्यासाठी एक प्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले. ग्राहकाने प्रक्रिया करताच तिकीट रद्द केल्याचे पैसे तर मिळाले नाहीत उलट त्यांच्या खात्यातील ३२ हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी पळविली़

सिव्हिल लाइन्स परिसरातील एका युवकाने व्यावसायिक कर्जासाठी ऑनलाइन माहिती मिळविली. त्यानंतर युवकाला टेक्स्ट मेसेज आले व विविध ॲपच्या लिंकही पाठविण्यात आल्या. या युवकाने ॲप डाऊनलाेड केल्यानंतर त्यांनी सर्व प्रक्रियेत अलाऊ हे ऑप्शन निवडताच त्यांच्या खात्यातील रक्कम ऑनलाइन चाेरट्यांनी पळविली. त्यामुळे काेणताही ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगा़

या आमिषांपासून सावधान

अत्यंत कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून एका तासात कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्याचे आमिष देण्यात येते़

आजच अर्ज आजच कर्ज अशा प्रकारच्या फायनान्स कंपन्यांच्या याेजना असल्याचे सांगून फसविण्याचा नवीन फंडा सध्या सुरू आहे.

तुम्ही लाॅटरीचे तिकीट खरेदी केल्यानंतरही तुम्हाला लाॅटरी लागत नाही़ मात्र तुमच्या माेबाइलवर लाॅटरी लागल्याचे तसेच तुमचा माेबाइल क्रमांक सिलेक्ट झाला असून तुम्हाला बक्षीस मिळणार असल्याचे आमिष देण्यात येते आणि या आमिषाला बळी पडत अनेक जण त्यांची संपूर्ण माहिती शेअर करतात. याच ठिकाणी त्यांची फसवणूक हाेते. त्यामुळे तुम्ही काेणतीही माहिती फाेनवर कुणालाही देऊ नका़

सचिन कदम

विलास पाटील

दहशतवादविराेधी कक्ष

ही घ्या काळजी

काेणतेही अनाेळखी आणि आमिष देणारे ॲप डाऊनलाेड करू नका

प्राेसेसिंग फी, विदेशातून आलेले गिफ्ट स्वीकारण्यासाठी काॅल आला तर टाळा

साेशल मीडियावर अनाेळखी व्यक्तींशी बाेलणे टाळा, म्हणजे फसवणूक हाेणार नाही