असा ओळखा आजार
डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, डोके दुखणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात.
या आहेत उपचारासाठी सुविधा
कोविड व स्टेरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, एन्डोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकर मायकोसीसचे निदान करणे सोपे आहे. उपचार पद्धतीत यावर एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शचा वापर केला जातो व आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते. आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे विशेषज्ञ उपलब्ध आहेत.
विनामूल्य उपाचार
राज्य शासनाने म्युकरमायकोसीसचा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत केला आहे. त्याअंतर्गत या योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये व शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारावर विनामूल्य उपचार होतील, अशी व्यवस्था शासनाने केली आहे.
रुग्णांनी घ्यावी काळजीकोविडमधून बरे जालेल्या रुग्णांना मधुमेहासारख्या आजारांची पार्श्वभूमी असल्यास त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
रक्तातील साखर नियंत्रीत ठेवावी.
मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासावे.
डॉक्टरांनी घ्यावयाची काळजी
औषधोपचारात स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा.
उपचारादरम्यान ऑक्सिजन वापरण्याची वेळ आल्यास ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे.
म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढत असला, तरी सतर्कता बाळगल्यास या आजारापासून बचाव शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारा विषयीचे गैरसमज दूर करून आजारावर वेळीच उपचार घ्यावा. तसेच कोविडच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला