अकाेला : हुंडा घेतला किंवा दिल्यास पदवी रद्द करण्याचा निर्णय केरळमधील विद्यापीठाने घेतला आहे. त्यानंतर हुंड्यासाठी छळ तसेच हुंडाबळीच्या घटना यावर प्रकाश टाकला असता हुंडा नेमका कुणाला घ्यायचा असताे, हे समाेर येत नाही. कधी मुलांना हुंडा हवा असताे तर काही ठिकाणी मुलगा उच्चशिक्षित आहे म्हणून त्याच्या आई-वडिलांकडून हुंड्याची मागणी करण्यात येते. तर बऱ्याच वेळा वधुपक्षाकडूनही स्वखुशीने हुंडा देण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांमधील आकडेवारी पाहिली तर दिवसाआड हुंड्यासाठी छळाची तक्रार हाेत असल्याचे समाेर आले आहे. बहुतांश वेळा हुंड्यासाठी छळ करण्यात येत असलेल्या प्रकरणांमध्ये काही बनावट असल्याचेही उघडकीस आले आहे. तर काही वेळा आराेपींचा समावेश असलेल्यांना खुद्द तक्रारदार महिलाच ओळखत नसल्याचे वास्तव आहे. यावरून हुंड्यासाठी छळ हाेत असल्याचे सत्य असले तरी बरेच वेळा काही प्रकरणे बनावट असल्याचीही उदाहरणे अकाेला पाेलिसांच्या भराेसा सेलसमाेर आले आहे.
हुंडाविराेधी कायदा काय?
हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांविराेधात काैटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम २००५ नुसार ४९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. सुरुवातीला हा गुन्हा अजामीनपात्र हाेता. मात्र बऱ्याच प्रकरणात खाेट्या तक्रारी असल्याचे समाेर आल्यानंतर सासरच्या मंडळीना जामीन मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सासरच्या मंडळींना अटक करण्यात येत नसून त्यांना जामीन मिळत आहे. तर अनेक प्रकरणात शिक्षाही हाेत असल्याचे वास्तव आहे़
जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी
२०१९ २३५
२०२० १८९
२०२१ १०३