शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

२५४ कोटींचा ‘डीपीआर’; ११0 कोटी मंजूर

By admin | Published: October 25, 2016 3:08 AM

अमृत योजना मार्गी; राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची हिरवी झेंडी

अकोला, दि. २४- अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तयार केलेल्या २५४ कोटींच्या डीपीआर (प्रकल्प अहवाल) मधील ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला सोमवारी राज्यस्तरीय तांत्रिक मूल्यमापन समिती व राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने हिरवी झेंडी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी योजनेचा प्रस्ताव सादर केला. पहिल्या टप्प्यात शहरात जलवाहिनीचे जाळे, जलकुंभांची उभारणी आदींचा समावेश आहे. संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने पाणीपुरवठा योजनेसाठी २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. सदर प्रस्ताव महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे सादर केला असता, शासनाने ह्यअमृतह्णयोजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता दिली.दोन समित्यांसमोर सादरीकरणअमृत योजनेच्या प्रस्तावावर नगर विकास विभागात दोन बैठका पार पडल्या. पहिल्या बैठकीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी राज्यस्तरीय तांत्रिक मूल्यमापन समितीसमोर योजनेचे सादरीकरण केले. समितीच्या प्रमुख नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर होत्या. दुसर्‍या बैठकीत प्रधान सचिव म्हैसकर यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीचे प्रमुख मुख्य सचिवांसमोर योजना सादर केली.दुसर्‍या टप्प्यात नवीन भागाचा समावेशशहरात समावेश झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांचा योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडेल. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. दुसर्‍या टप्प्यात या सर्व बाबींचा मजीप्रा व पाटबंधारे विभागाकडून तांत्रिक अभ्यास करून समावेश केला जाईल. या कामांचा आहे समावेशयोजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर ११0 कोटी ८४ लाखातून शहरात नवीन आठ जलकुंभांची उभारणी करणे, २६४ किमीची जुनी जलवाहिनी बदलणे, १६१ किमी अंतराची नवीन जलवाहिनी टाक णे, कान्हेरी सरप गावानजीक ४ किमी अंतराची पाइपलाइन बदलण्यासह विविध कामांचा समावेश आहे. मजीप्राने तयार केलेल्या २५४ कोटींच्या डीपीआरमधून पहिल्या टप्प्यासाठी ११0 कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला. मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा काढावी लागेल. दुसर्‍या टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित कामे मार्गी लागतील.- अजय लहाने, आयुक्त, मनपा