पुढील आर्थिक वर्षात संस्था स्वबळावर येण्याची शक्यता असल्यामुळे पुढील आर्थिक वर्षात अंदाजपत्रकानुसार संस्थेला एक कोटींपर्यंत नफा अपेक्षित असल्याचे मत अध्यक्ष वानखडे यांनी प्रास्ताविकात मांडले. ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचारी पतसंस्था मर्यादित अकोला र.नं. ११७ चे संस्थेत विलीनीकरणाबाबत अध्यक्षांनी सांगताच सभासदांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घेण्याबाबत सुचविले.
सभेच्या अध्यक्षस्थानी राजेश्वर बंड होते, तर प्रमुख उपस्थिती पुरुषोत्तम मंडासे यांची होती. सभेत विषयी पत्रिकेचे वाचन करून सर्व ठराव बहुमताने मान्य केले. कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे संचालक धीरज खंडारे यांनी केले, तर आभार प्रमोद काळपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ, गणेश राऊत, दिनेश बोधनकर, नितीन देशमुख, रूपेश माहुलकर यांनी सहकार्य केले. (वा.प्र.) ८ बाय १०