अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे साकारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सैलेन्स फाॅर इंटरनेट ऑफ थिंग्स इन एग्रीकल्चर अर्थात ‘कृषी माहिती तंत्रज्ञान गुणवत्ता केंद्र’ यासाठी केंद्र सरकारने अकरा कोटी रुपये कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रोद्योगिकी मंत्रालयाच्या माध्यमातून व शैक्षणिक मंत्रालयाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. कृषी माहिती तंत्रज्ञान गुणवत्ता केंद्रांच्या माध्यमातून सध्याच्या शेतीच्या विविध उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी 25 स्टार्ट-अप सुरू करून दूरस्थ संवेदन, अचूक शेती यांत्रिकीकरण, मृदा आरोग्य व्यवस्थापन, हायड्रोफोनिक्स व पॉलीहाऊस तसेच स्मार्ट कृषी अनुप्रयोग इत्यादीस चालना मिळणार आहे.