- अतुल जयस्वाल
अकाेला - डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १३ वे नवे कुलगुरू डाॅ़ शरद गडाख यांनी आज मंगळवार, दि. २० सप्टेंबर राेजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे यांच्याकडून पदभार स्विकारला.या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास एम. भाले यांचा कुलगुरूपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ ४ सप्टेंबर राेजी संपला,तत्पुर्वी कुलगुरू निवड प्रक्रिया राज्यपालांनी सुरू केली हाेती.
या अनुषंगाने भारतीय कृषी संशाेधन परिषदेचे माजी महासंचालक डाॅ़ एस.अयप्पन यांच्या अध्यक्षततेखाली त्रिसदस्यीय कुलगुरू पदासाठी निवड समिती गठीत केली हाेती. इच्छूक ३० वरिष्ठ शास्त्रज्ञ,संचालकांच्या मुलाखती या समितीने २९ ऑगस्ट राेजी घेऊन याातील पाच नावांची यादी राज्यपालानां पाठविली. राज्यपालांनी ७ सप्टेंबर राेजी पाच शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेतल्या़ या पाच नावातून राज्यपालांनी डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशाेधन संचालक डाॅ. शरद गडाख यांच्या नावावर १९ सप्टेंबर राेजी शिक्कामाेर्तब केले़ तथापि कुलुगुरूपदासाठीच्या निवडीला विलंब हाेणार असल्याने राज्यपालांनी या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा तात्पुरता प्रभार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे यांच्याकडे साेपिवला हाेता. डाॅ. शरद गडाख हे या कृषी विद्यापीठाचे नियमित १३ वे कुलगुरू असून, प्रभारी मिळून २२ वे कुलगुरू आहेत.