शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डाॅ.सुनिल लहाने यांनी स्वीकारली आयुक्तपदाची सुत्रे

By आशीष गावंडे | Published: March 07, 2024 8:22 PM

महापालिकेच्या कामकाजाचा आज घेणार आढावा

अकाेला: महापालिकेत डाॅ.सुनिल लहाने यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. शुक्रवारी ते प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतील. 

महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदी यांची राज्य शासनाने २३ फेब्रुवारी राेजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली हाेती. तेव्हापासून मनपाच्या आयुक्तपदी काेण, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मध्यंतरी शासनाकडून नियुक्त झालेल्या मनपातील काही अधिकाऱ्यांनी आयुक्तपदासाठी मंत्रालयात वेगवान हालचाली केल्या हाेत्या. अखेर नगर विकास विभागाने ६ मार्च २०२४ राेजी नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत डाॅ.सुनिल लहाने यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

डाॅ.लहाने यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. महापालिकेत दाखल झाल्यानंतर उपायुक्‍त गीता वंजारी, गीता ठाकरे यांच्‍या हस्‍ते डॉ.लहाने यांना पुष्‍पगुच्‍छ देण्यात आला. यावेळी मुख्‍य लेखापरिक्षक विकास खामकर, नगर रचनाकार आशिष वानखडे, सहा.आयुक्‍त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, अनिल बिडवे, अतुल दलाल, गजानन मुर्तळकर, संजय राजनकर, अमोल डोईफोडे, शाम बगेरे, शाम राऊत, जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती. 

आठ महिन्यानंतर पुन्हा अकाेल्यात वर्णीनांदेड महापालिकेत आयुक्तपदावर कार्यरत असताना राज्य शासनाने डाॅ.सुनिल लहाने यांची जुलै २०२३ मध्ये अकाेला महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती आदेश जारी केला हाेता. परंतु तेव्हा डाॅ.लहाने यांनी पदभार स्वीकारला नव्हता. यादरम्यान, त्यांची नागपूर मनपात बदली झाली. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आता पुन्हा डाॅ.लहाने यांची अकाेला मनपात आयुक्तपदी वर्णी लागली,हे येथे उल्लेखनिय.

टॅग्स :Akolaअकोला