अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त कृषी विद्यापीठात आदरांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, आयोजक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यांविद्या डॉ.प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला कुलगुरू तथा उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेबांचे प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रमोद वाकळे यांचेसह विस्तार शिक्षण संचालनालयाच्या चमूने परिश्रम घेतले.