अकोला आगार क्रमांक एक म्हणजेच, जुना बस स्टॅन्ड येथून सायंकाळी अकोला-पांगरताटी, अकोला-सावरगाव, अकोला-पिंपळखुटा या तीन बसेस उपरोक्त गावी, तीन बसेस मुक्कामाला जायला निघतात. बसेस कोरोनाच्या संसर्गातही दररोज प्रवाशांना सेवा देतात. रस्त्याच्या दुतर्फा गावागावांतील नागरिक रस्त्यावर उघड्यावर शौच केल्यामुळे बसगाडी घाणीने भरते. मुक्कामाच्या गावी पोहोचल्यानंतर बसमध्ये शौच दुर्गंधीयुक्त वातावरणात जेवण करावे लागते.
जेवणानंतर बसमध्ये झोपावे लागते. रात्रभर डासांचा उच्छाद कायम असतो. सकाळी उठल्यानंतर सार्वजनिक शौचालय नसल्याने उघड्यावरच स्वच्छता करण्यासाठी जावे लागते. प्राप्त माहितीनुसार, गावामध्ये मुक्कामी येणाऱ्या बस वाहक आणि चालकासाठी एक खोली ग्रामपंचायतीमध्ये राखून ठेवण्याचे आवश्यकता आहे. मात्र, वास्तवात अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था मुक्कामाच्या गावी नाही.
दिवसभर बस चालविणे आणि प्रवासी वाहतूक करणे, अपुऱ्या झोपेमुळे कामाचा ताण अधिकच वाढतो.
ग्रामीण भागातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत वाहक, चालकसेवा देत आहेत.
रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस
३७
मुक्कामी थांबावे लागते असे वाहक-चालक
चालक- ३७
वाहक- ३७
काेरोनामुळे कोणी मदत करीत नाही
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, मुक्कामाच्या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक व चालकांना कोणी मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. काही गावांमध्ये गावातील सहृदयी नागरिक पिण्याच्या पाण्याची तेवढी व्यवस्था करतात. गावांमध्ये सार्वजनिक शौचालय नसल्याने, सकाळी उघड्यावरच शौचास जावे लागते.
फोटो:
वाहक, चालकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात बसमध्ये प्रवास करावा लागतो. बसगाडीतच जेवण घ्यावे लागते. मुक्कामाच्या ठिकाणी वाहक-चालकांसाठी रात्री पुरेशी झोप मिळावी. यासाठी स्वतंत्र खोली असावी
- अजयकुमार पोहरे, चालक
रात्रीच्या वेळी प्रवास केल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी बसगाडीच्या छतावर किंवा बसमध्येच रात्र काढावी लागते. बस चालक व वाहकांना मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असावी.
- गोवर्धन खंडारे, वाहक पांगरताटी बस