शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘ड्रोन’ची चाचणी

By admin | Published: October 15, 2016 3:19 AM

अकोला मनपा क्षेत्रातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाला उद्यापासून सुरुवात.

अकोला, दि. १४- 'जीआयएस' प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करण्यासाठी अत्याधुनिक 'ड्रोन'ची मदत घेतली जाणार असून, शुक्रवारी महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शास्त्री स्टेडियमवर 'ड्रोन'ची यशस्वी चाचणी घेतली. शनिवारपासून 'ड्रोन'द्वारे मालमत्तांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे.शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन करून उत्पन्न वाढीसाठी प्रशासन सरसावले आहे. उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय म्हणून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी 'जीआयएस' प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी स्थापत्य कन्सलटन्सी प्रा. लि. अमरावती यांना कंत्राट दिला. इंटरनेटच्या माध्यमातून गूगलद्वारे मालमत्तांचे घेतल्या जाणारे छायाचित्र अचूक व स्पष्ट नसल्याचे स्थापत्य कंपनीच्या निदर्शनास आल्यामुळे कंपनीने केंद्र शासनाच्या अख्त्यारित असलेल्या सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे, यांच्याशी संपर्क साधत अत्याधुनिक 'ड्रोन'ची व्यवस्था केली. गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी पुणे व दिल्ली येथील संबंधित प्रतिनिधी अकोल्यात दाखल झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी सकाळी शास्त्री स्टेडियमवर ड्रोनची चाचणी घेण्यात आली. यावेळी खा. संजय धोत्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उज्ज्वला देशमुख होत्या. प्रमुख आमंत्रित म्हणून आ. रणधीर सावरकर यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी उपमहापौर विनोद मापारी, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, विरोधी पक्षनेता साजीद खान, महापालिका आयुक्त अजय लहाने, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, उपायुक्त समाधान सोळंके, सुरेश सोळसे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, नगरसेवक दिलीप देशमुख, सतीश ढगे, सुनीता अग्रवाल, शाहीन अंजूम, अनहलक कुरेशी, अफसर कुरेशी, किशोर मानवटकर, सागर शेगोकार व जयंत मसने यांची उपस्थिती होती. संचालन क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांनी तर आभार कर अधीक्षक विजय पारतवार यांनी मानले.