अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने हा परिणाम जाणवत आहे.
हरभऱ्याची आवक सुरूच
अकोला : खरीप हंगाम काही दिवसावर आला आहे. तरी बाजार समितीत हरभऱ्याची आवक सुरू आहे. मंगळवारी बाजार समितीत १ हजार २५९ क्विंटल आवक झाली होती. तर सरासरी ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
रोहित्राचे पेटी उघडीच
अकोला : शहरातील बाळापूर नाका परिसरातील एका रोहित्राची पेटी उघडीच आहे. रोहित्राला लागूनच नाला बांधकाम सुरू असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने वेळीच लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.
फुल विक्री वाढली
अकोला : मागील अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात कडक निर्बंध असल्याने फुल विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु मंगळवारपासून निर्बंधातही सूट मिळाल्याने काही प्रमाणात फुल विक्री वाढली. तरी लग्न, समारंभ बंद असल्याने मागणी कमी दिसून येते.