अकोला : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानाच सलग घसरण होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस तापमानात घसरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.---------------------------------------------
एसटीअभावी गैरसोय
अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे कोरोना संकटकाळात एसटी बसेस बंद आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़. बसफेरी सुरू करण्याची मागणी आहे.
---------------------------------------------
जंगलात पाणवठे तयार करण्याची मागणी
अकोला : वनविभागाचे जिल्ह्यामध्ये माेठे जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. आता उन्हाळा सुरू हाेताच या वनातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे.
-------------------------------------------
वातावरणातील बदलामुळे भीती
अकोला : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
----------------------------------------------
उघडी रोहित्रे ठरली धोकादायक
अकोला : विद्युत पुरवठ्यासाठी रोहित्र बसविल्या जातात. प्रारंभी त्या पेटीबंद असतात; पण या पेट्यांची दारे चोरी होत असल्याने उघड्या आहेत. यामुळे अपघाताचा धोका आहे.
----------------------------------------------
मजुरांना काम हवे!
अकोला : शेतातील कामे आटोपत चालली आहे. इतर प्रकारची कामेही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने कामे देण्याची मागणी करण्यात येत आहे.
-------------------------------------------------
पशुपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी प्याऊ
अकोला : शहरात सिमेंटचे जंगल पसरल्याने पक्ष्यांना पाणीच उपलब्ध होत नाही. गर्द सावलीची झाडे नष्ट झाली आहेत. आता उन्हाचा पारा वाढल्याने पक्ष्यांना आडोसा शोधताना अडचण होत आहे. वन्यजीव प्रेमींकडून प्याऊ ठेवण्यात आले.
--------------------------------------------------
ढगाळ वातावरणाने उकाड्यात वाढ
अकोला : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यातच वीज गुल होत असल्याने नागरिक कासावीस होत आहेत.