सायखेड (जि. अकोला): दुष्काळाची दाहता दिवसेंदिवस तीव्र होत असून, डबक्यातील दूषित पाणी िपल्यामुळे १७ बकर्यांचा मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. आठ बकर्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मनुष्याला पिण्याच्या पाणीसाठी पायपीट करावी लागत आहे. जनावरांच्या पाण्याचा आणि चार्याचा प्रश्न तर गंभीर झाला आहे. त्या किंमतीत विकत आहेत. जलस्त्रोत आटल्याने जनावरांची पाण्यासाठी प्रचंड भटकंती होत आहे. बकर्या मृत पावल्याच्या घटनेची माहिती मिळताच पशुचिकित्सक डॉ. चेके व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व गंभीर बकर्यांवर उपचार केले. २ मे रोजी शवविच्छेदन डॉ. एम.एल. साठे यांनी केले. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. पशुपालकांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसीलदार यांना माहिती देण्यात आली आहे.
दुष्काळदाह: दूषित पाणी पिल्यामुळे १७ शेळय़ांचा मृत्यू
By admin | Published: May 03, 2016 2:16 AM