अकोला: दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे; मात्र दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिली जाणारी ही दुष्काळी मदत अत्यंत तोकडी ठरत असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून उमटत आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदत वाटप करण्याकरिता २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदतनिधी दोन हप्त्यांत वितरित करण्यास शासनामार्फत २५ जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिल्या हप्त्यामध्ये ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येणार असून, शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाकडून देण्यात येत असलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यात शेतकºयांमधून उमटत आहेत.दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत ही तुटपुंजी आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी किमान २० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली पाहिजे.- प्रशांत गावंडेशेतकरी जागर मंच, अकोला.दुष्काळी परिस्थितीत शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ही मदत दिलासा देणारी आहे.- गणेश कंडारकरजिल्हाध्यक्ष, भाजपा शेतकरी आघाडी.