अकोला: दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक १५ डिसेंबरपासून अमरावती विभागात दाखल होत आहे. तीन दिवसांच्या दौर्यात अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकर्यांच्या हातून गेली. अत्यल्प पाऊस, नापिकी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. या पृष्ठभूमीवर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्याच्या दौर्यावर येत आहे. त्यामध्ये १५, १६ व १७ डिसेंबर रोजी केंद्रीय पथक अमरावती विभागाच्या दौर्यावर येत आहे. या तीन दिवसांच्या दौर्यात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केंद्रीय प थकाकडून केली जाणार आहे. जिल्हानिहाय दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर, या प थकाकडून दुष्काळी परिस्थितीचा पाहणी अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
दुष्काळी परिस्थिती : १५ डिसेंबरपासून केंद्रीय पथक विभागात
By admin | Published: December 08, 2014 1:07 AM