अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी २४ नवे कृषी शास्त्रज्ञ देशाला दिले. ३३ वा दीक्षांत समारंभात कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती चंद्रकात पाटील यांच्याहस्ते मंगळवारी आचार्य (पीएचडी) प्रदान करण्यात आली.पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अर्चना थोरात, अमोल शितोळे,कोमल भास्कर, संजय देशमुख,अनिल खाडे,सुषमा इंगळे, स्नेहल जुक्टे,अश्विनी चंदेल,इंदाल रामटेके,पुरू षोत्तम देशमुख, विशाल बागडे,अंकिता अंगाईतकर, निता देवकाटे,महिपाल गणवीर,कुणाल गायकवाड, सोनाली वानखडे,मंगेश बावीसकर, कुंतल सातकर, वैभव लाजूरकर, सविता पवार, रजनी साळुंखे, राहुल रामटेके, सुहास उपाध्ये,स्नेहा देशमुख यांचा समावेश आहे.यामध्ये रामटेके व गणवीर यांनी नोकरीत ही पदवी प्राप्त केली.
-उत्कृष्ठ शास्त्रज्ञांना पदकेउत्कृष्ठ शिक्षक म्हणून उल्लेखनीय करणारे डॉ. निरज सातपतुे रौप्य पदक तर डॉ.यु.एस.कुळकर्णी यांना उत्कृष्ठ शिक्षक पारितोषीक प्रदान करण्यात आले.कृषी व पशूविज्ञान विषयात उत्कृष्ठ संशोधक म्हणून डॉ.पी.एच. बकाने, डॉ.एम.बी.नागदेवे, एम.बी.खेडकर तसेच डॉ.एस.आर. काळबांडे,व्ही.पी.खांबलकर यांना प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते रोख पोरितोषिके देऊन गौरविण्यात आले.