अकोला : सिव्हिल लाइन्स रोडवरील मेडिकल दुकानामधून दोघा चोरट्यांनी गो-ग्राससाठी ठेवलेली दानपेटी पळविल्याची घटना ६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. जवाहरनगरातील आशिष श्रॉफ यांचे सिव्हिल लाइन्स रोडवर मेडिकल स्टोअर्स आहे. या मेडिकलच्या कॅश काउंटरजवळ गायींच्या चार्यासाठी गो-ग्रास पेटी ठेवण्यात आली आहे. या पेटीत मेडिकल दुकानावर येणारे ग्राहक आणि मेडिकलचे संचालक आशिष श्रॉफ हे दररोज काही रक्कम जमा करतात आणि दर महिन्याला ही रक्कम गोरक्षण संस्थेला दान देतात. या गो-ग्रासची पेटीत शनिवारी पाच हजार रुपयांच्या वर रक्कम होती. अज्ञात चोरटे दुकानावर आले आणि त्यांनी ही पेटी घेऊन पळ काढला. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर श्रॉफ यांनी या घटनेची माहिती तत्काळ सिव्हिल लाईन्स पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यांनतर अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला. चोरट्यांचा शोध न लागल्याने अखेर सोमवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
औषध दुकानातून गो-ग्रासची पेटी पळविली!
By admin | Published: May 09, 2017 2:42 AM