- राजरत्न सिरसाटअकोला : सतत आठ दिवसापासून विदर्भात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस बरसत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला असून, अकोला जिल्ह्यतील तेल्हारा तसलुक्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा तसेच हिरव्या उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक वाढली. पिकांना प्रकाशसंश्लेषन होत नसल्याने पिकांची मुळ सडण्याची शक्यता आहे.विदर्भात यावर्षी उशिरा पावसाला सुरू वात झाली. जूलैनंतर बुलडाणा जिल्हा वगळता सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस होत आहे पण गत आठ दिवसापासूप सतत रिमझीम सुरू असून, सूर्यप्रकाशाचे दर्शन झाले नसल्याने खरीप हंगामातील सर्वच पिकांवर किड,रोगांचा धोका वाढला आहे. अकोला जिल्हयात तेल्हारा तालुक्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याच तालुक्यातील पाच जिनंीगमध्ये मागीलवर्षी साठवून ठेवलेलल्या कपाशीवर गुलाबीबोंड कृषी शास्त्रज्ञांच्या निदर्शनात आली असून, साठवलेल्या कापसाची तातडीने विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी जिनंीग संचालकांना मार्गदर्शन केले.बोंडअळी फुले,पात्यांच्या अवस्थेत कपाशीवरच्या झाडावर पोषण करते तथापि यावर्षी ही अळी चक्क कोवळ्या पानावरच दिसून आल्याने हे यावर्षी नवे संकट मानले जात आहे. बीटी कापसात बोंडअळीला प्रतिबंधक जीन असताना यावर्षी एवढ्या लवकर बोंडअळी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, शेतकºयांनी कोणती बीटी कपाशी पेरली हे शास्त्रज्ञ, कृषी विभागाला बघावे लागणार आहे.सोयाबीनवर स्पोडोप्टेरा (तंबाखूची पाने खानारी अळी) सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. सद्या या अळीची नुकसानीची पातळी कमी असली तरी २००९ वर्षीचा अनुभव बघता ही अळी कधीही उग्ररू प धारण करू शकते. त्यामुळे शेतकºयांना दररोत शेताचे सर्वेक्षण करू न या अळीचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच हिरव्या उंटअळीने चाल केल्याने शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.
आठ दिवसापासून रिमझीममागील आठ दिवसापासून विदर्भात बहुतांश ठिकाणी रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साचले असून,सुर्यप्रकाश नसल्याने पिकांच्या मुळे कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.शेतकºयांनी याकरिता शेतातील पाणी बाहेर काढण्याची गरज आहे.
तेल्हारा तालुक्यात काही शेतावर कपाशीवर गुलाबी बोंडअळी निदर्शनात आली असून, जिनींगमध्ये साठवून ठेवलेल्या कपाशीवरही ही अळी आहे. जिनींग संचालकांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकºयांनी घाबरू न न जाता शिफारशीप्रमाणे बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला.- डॉ. धनराज उंदीरवाडे,विभाग प्रमुख,किटकशास्त्र विभाग,डॉ.पंदेकृवि,अकोला.