संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले असताना, जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची स्थिती असून, कपाशी पिकाच्या उत् पादनाचेही खरे नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार २0१७-१८ या वर्षातील जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सा तही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप िपकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. नियमानुसार खरीप पिकांची ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते; परंतु कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरले अस ताना, प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी नजरअंदाज पैसेवारी ६१ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर! खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व गावांची सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली. खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत किती जाहीर केली जाते, याकडे आता जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.