- सदानंद सिरसाटअकोला: अध्यापनाचे काम करण्यास वैद्यकीय, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. शिक्षकांची माहिती ८ मे पर्यंत सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.शिक्षण विभागात सुधारणा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी टास्क फोर्सचे गठन केले आहे. त्या टास्क फोर्सची आढावा सभा २ मे रोजी पार पडली. विविध मुद्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले. त्यामध्ये शिक्षकांना हवालदिल करणाºया आदेशामुळे अनेकांची झोपच उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिलेल्या निर्देशामध्ये ज्या शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करावयाचे आहे, त्यांची यादी तयार करण्याचे म्हटले. तसेच त्यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करण्यासाठी काय करता येईल, याचाही तपासणी अहवाल त्यांनी मागवला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी शुक्रवारीच तसे पत्र जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाºयांना दिले.पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षक अध्यापनाचे कार्य करण्यास वैद्यकीय, शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या शिक्षकांची यादी तातडीने सादर करण्याचे शिक्षणाधिकाºयांनी बजावले. ८ मे रोजी १२ वाजेपर्यंत ती यादी कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात जमा करावी, असेही पत्रात बजावले. विशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे यादी सादर करण्यास विलंब झाल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाºयांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला.- शिक्षक धास्तावलेदीर्घ आजार, शारीरिक व्यंग असलेल्या शिक्षकांना नोकरीचा आधार आहे; मात्र सेवानिवृत्तीच्या आधीच नोकरी हिरावली गेल्यास कसे जगावे, हा मोठा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे या आदेशाने जिल्ह्यातील शिक्षकांचे धाबे दणाणले.-आजारी कर्मचारी बदलीसाठी पात्रविशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत आजारी, व्यंग असलेल्यांना विनंती बदलीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये पक्षाघाताने आजारी, अपंग कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया, एकच मूत्रपिंड असलेले, डायलिसिस सुरू असलेले, कर्करोगी, आजारी, वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी पात्र आहेत. त्याचवेळी या कारणाने सक्षम नसलेल्या शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीसाठी पात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.