अकोला: शहरातील गौरक्षण संस्थाच्या बाजूला असलेला रस्त्याचे काम एकावर्षापासून अर्धवट आहे. एका वर्षात मरण पावल्याने या रस्त्यासाठी वंचित युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेत दि. १३ मार्च रोजी शोकसभा आयोजित करून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वंचित अकोला पूर्व पश्चिम युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पांढरे कपडे परिधान करून सभेत सहभागी झाले होऊन रस्त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. आगामी दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत रस्त्याचे दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण न झाल्यास रस्त्यासाठी श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम आयोजित करू, असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
७०० फुटाच्या या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले. भाजपाचे खासदार, आमदार आणि महापौर यांच्या भ्रष्टाचाराने रस्ते मरण पावल्याची टिकाही याप्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी सचिन शिराळे, उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, विकास सदांशिव, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, आदित्य इंगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, शेखर इंगळे, लखन वाकोडे, रवि वाघ,आदित्य गोपनारायण, नागेश अहिर, अक्षय भालेराव, आशिष शिरसाठ, अंकित इंगळे, ऋषभ इंगळे, सिद्धांत पोहरे, आनंद शिरसाट विजय मुंडे, प्रकाश ढोकणे, करण पळसपगार, प्रतीक थुंकेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.