लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जलयुक्त शिवार योजनेतील खोदतळ््यांची कामे करताना संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण न करताच तांत्रिक मान्यता दिल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे अनेक खोदतळ््यांची जागा नाल्याच्या प्रवाहाऐवजी बाहेर जमिनीवर निश्चित केल्याने, या कामांतून जलयुक्त शिवारचा उद्देशच सफल होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. तेल्हारा तालुक्यातील काळेगाव येथे चार खोदतळ््यांसाठी केलेला ६० लाखांचा खर्चही वाया गेल्याची माहिती आहे.खोदतळ््यांच्या कामांना तांत्रिक मंजुरी देताना शासनाच्या तांत्रिक व आर्थिक मापदंड जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने पाळले नाहीत. सोबतच पाटबंधारे, कृषी विभागाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी तयार केलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामातही हाच प्रकार केल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, खोदतळ््यासाठी शासनाचे कोणतेही नियम शिथिल नसतानाही ते जमिनीवर तयार करण्यासाठी तांत्रिक मान्यता दिल्याचा प्रकारही उजेडात आला आहे. तसाच प्रकार तेल्हारा तालुक्यातील काळेगाव येथे ६० लाख रुपये खर्चातून चार खोदतळ््यांची कामे करताना घडला आहे.काळेगावात ई-क्लास जमिनीमधून गावाच्या दिशेने प्रवाह असणारा नाला आहे. त्या नाल्यावर २००५ मध्ये गावतलाव बांधण्यात आला. त्याची दुरुस्तीही गेल्यावर्षीच झाल्याने तो सुस्थितीत आहे. त्यानंतर सरकारी जमिनीवर चार मोठ्या खोदतळ््यांची कामे करण्यात आली आहेत. त्या कामांना जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने तांत्रिक मंजुरी दिली, तर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ३० मार्च २०१६ रोजी ६० लाख ३९ हजार रुपयांचा निधी वितरित केला. त्यातून झालेली कामे पाहता हा लाखोंचा खर्च वाया गेल्याचे दिसत आहे. खोदतळे क्रमांक १ व २ मध्ये पाण्याचा कोणताही स्रोत नाही. खोदतळे क्रमांक एकचे आउटलेट दुसºया क्रमांकाच्या खोदतळ््याचे इनलेट दाखवण्यात आले. तसेच खोदतळे दोनचे आउटलेट गावतलावाच्या सांडव्यात सोडण्यात आले.दोन्ही खोदतळ््यांच्या बाजूला कृषी विभागाचे शेततळे आहे. त्यामुळे दोन्ही खोदतळ््यांच्या कामांवर अनावश्यक खर्च झाला. तसेच अस्तित्वात असलेल्या गावतलावाच्या नाल्याच्या डाव्या व उजव्या बाजूला खोदतळे क्रमांक ३ व ४ चे खोदकाम करण्यात आले. तांत्रिकदृष्ट्या त्या चारही कामांवरील ६० लाख रुपयांचा निधी वाया गेल्याची तक्रार संजय सुरवाडे यांनी केली.नियोजन विभागाच्या मापदंडाला हरताळशासनाच्या नियोजन विभागाने २० जानेवारी २०१० रोजीच्या आदेशात मृदसंधारण व जलसंधारणाच्या विविध उपचारांसाठी तांत्रिक, आर्थिक मापदंडाचा सुधारित गोषवारा दिला. त्यामध्ये खोदतळे म्हणजे पाण्यात बुडणारे खोदतळे (डग आउट संकन पाँड) या उपचारासाठी ३० : २० : ३ मीटर कामासाठी आर्थिक मापदंडही ठरले आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने शासनाचा आराखडा डावलून १०० : १०० : ३ मीटर आकाराच्या खोदतळ््यांच्या अंदाजपत्रकांना २५ लाख रुपयांच्या खर्च मर्यादेत तांत्रिक मान्यता दिली. खोदतळ््याची ही कामे नाला तळाशी न घेता जमिनीवर केल्याने निधी वाया घालवण्यात आला.
खोदतळ््याची कामेही ‘पाण्यात!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:45 AM
अकोला: जलयुक्त शिवार योजनेतील खोदतळ््यांची कामे करताना संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण न करताच तांत्रिक मान्यता दिल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे अनेक खोदतळ््यांची जागा नाल्याच्या प्रवाहाऐवजी बाहेर जमिनीवर निश्चित केल्याने, या कामांतून जलयुक्त शिवारचा उद्देशच सफल होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
ठळक मुद्देजलयुक्त शिवारसाठ लाखांचा खर्च गेला वायानियोजन विभागाच्या मापदंडाला हरताळ