ठळक मुद्देइनडोअर गेम्स आणि मोबाइलचा वापर वाढला मुलांमधील स्थूलता वाढली
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा बंद आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे मुलांचे मैदानी खेळही बंद झाले आहेत. त्यामुळे इनडोअर गेम्स आणि मोबाइलचा वाढता वापर यामुळे मुले एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मुलांमधील स्थूलपणा वाढल्याने कोरोना काळात लहान मुले ‘मोटू’ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला. तेव्हापासूनच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिवाय, लॉकडाऊनमुळे लहान मुलांचे मैदानी खेळही बंद झाले. परिणामी, या मुलांचा कल इनडोअर गेम्सकडे वाढला आहे. या काळात मुलांचा अभ्यासही मोबाइलवरच होऊ लागल्याने त्यांचा स्क्रीन टाइमदेखील वाढला. अभ्यासासोबतच मुले मोबाइलवर कार्टून्स आणि व्हिडिओ गेम्सच्या जास्त आहारी गेल्याने मुलांमध्ये एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाणही वाढले. मात्र त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. अनेक कुटुंबातील लहान मुलांमध्ये स्थूलपणाची समस्या उद्भवू लागली आहे. मुलांचे वजन वाढू लागल्याने त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.वजन वाढले, कारण...कारोना काळात मैदानी खेळ खेळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झाला.इनडोअर गेम्स प्रामुख्याने बैठे खेळ असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची कुठल्याच प्रकारची हालचाल होत नाही.शिवाय, मोबाइलवरील स्क्रीन टाइम वाढल्यानेही एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, स्थूलपणा वाढला.खानपानाचेही गणित बिघडल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवत असल्याचे चित्र आहे.वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजीसध्या काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आवश्यक सुरक्षा साधणांचा वापर करून मुलांचा व्यायाम होईल, असे खेळ खेळणे आवश्यक आहे. (उदा. बॅडमिंटन)मोबाइलवरील व्हिडिओ गेम्स आणि कार्टून व्हिडिओ बघण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक आहे. परिणामी, मुले एकाच जागी जास्त काळ बसून राहणार नाहीत.या सर्व बाबींसोबतच मुलांच्या खानपानाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना पौष्टिक आहार दिल्यास त्यांचे आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल.लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...कोरोनाच्या काळात मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. परिणामी, बहुतांश मुले एकाच जागी बसून राहत असल्याने त्यांच्या शरीराला आवश्यक व्यायाम मिळत नाही. परिणामी, मुलांमध्ये काही प्रमाणात स्थूलपणाच्या समस्या दिसून येत आहेत. पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोलामुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीतशाळा बंद असल्याने मुलांचा अभ्यास मोबाइलवरच होतो, मात्र अभ्यास झाल्यानंतरही मुले मोबाइल सोडत नाहीत. मोबाइल सोडला, तर टीव्ही बघतात. कोरोनामुळे त्यांना बाहेर पाठविणेही शक्य नाही.- योगेश पाटील, पालककोरोना काळात लहान मुले झाली ‘मोटू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 10:23 AM