अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख पुन्हा उंचावत असून, बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या २८९ झाली आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ७० रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९२०८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीलएल लॅबकडून बुधवारी ८४४ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ७० जण पॉझिटिव्ह आढळून आले. उर्वरीत ७७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जठारपेठ येथील पाच जण, प्रभात किड्स येथील तीन जण, कौलखेड, कुंभारी, अमाख्या प्लॉट व अकोट येथील प्रत्येकी दोन, लोहगड ता. बार्शिटाकळी, धाबा ता. बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर, अकोट रोड, हिंगणा रोड, विद्युत नगर, रिधोरा ता.बाळापूर, पत्रकार कॉलनी, खिरपूरी, लोहारा ता. बाळापूर, बंबर्डा ता. अकोट, मलकापूर रोड, दुर्गा चौक, बाळापूर, गोरक्षण रोड, किनखेडपुर्णा ता. अकोट व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
सायंकाळी सिंधी कॅम्प येथील आठ, कौलखेड येथील पाच, शंकर नगर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड, पातूर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन, जीएमसी क्वॉर्टर, अकोट, जीएमसी, शिवर, शिवाजी नगर, शिर्ला अंधारे, आस्टूल, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, शिवाजी नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
बुधवारी पंचशील नगर, सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १८ नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
१३ जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, अशा एकूण १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५७७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,२०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५७७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.