अकोला : घरातून बाहेर निघताच अकोलेकरांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागतो. हिवाळ््यात मात्र ही धूळ आरोग्यास घातक ठरत असून, अस्थमासारख्या श्वसनाच्या विविध आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.ऐरवी रस्त्यावरील धुळीसोबतच वाहनांचा धूर जास्त काळ हवेत राहत नाही. हिवाळ््यात मात्र कार्बनडाय आॅक्साईड, सल्फाईडचे अडीच ते सहा मायक्रोन पार्टीकल्स दाट धुक्यांमध्ये तरंगतात. ही धूळ श्वसनाद्वारे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाच्या श्वसननलीकेत प्रवेश करते अन् अस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांना निमंत्रण देते. शहरातील विविध भागात रस्ते निर्मितीचे काम सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अकोलेकर सर्दी, खोकला, कफ दाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्येने ग्रासले आहेत. यापासून बचावासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.या समस्या उद््भवताहेतश्वसन नलिकेवर सूजकफ येणेवारंवार शिंका येणेसर्दी व खोकलाफुफुसांच्या क्षमतेवर परिणामधूळ आणि कार्बनडाय आॅक्साईड, सल्फाईडच्या श्वसनाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास फुफुसांची क्षमता कमी होऊ लागते.हे करामास्कचा उपयोग करा.थर्मोकॉल, प्लास्टिक जाळणे टाळा.रोगप्रतिकारकशक्ती वाढवा.नियमित व्यायाम व संतुलित आहार घ्या.
वाढत्या प्रदूषणासोबतच हिवाळ््यात धुक्यामध्ये तरंगणारे धुळीचे कण श्वसनाच्या आजारांना निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे घराबाहेर निघताना आवश्यक उपाययोजना कराव्या.- डॉ. अनिरुद्ध भांबुरकर, फुफुस व श्वसननलिका तज्ज्ञ, अकोला.