- राजेश शेगोकार
अकोला : संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन प्रचार आणि प्रसाराचे काम केले; मात्र त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच कर्मभूमीत स्थापन झालेल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या नऊ प्राध्यापकांची ड्यूटी चक्क दारुच्या दुकानावर लावण्याचा आल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नऊ दारु दुकानांवर या प्राध्यापकांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, दारु दुकानांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व इतर अटी, शर्तींच पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
गत दोन दिवसापासून महाराष्ट्र शासनाने राज्यभरात देशी व विदेशी दारू विक्रीचे नियम ठरवून दिले आहेत. तब्बल महिनाभरानंतर दारूचे दुकान एवढी झाल्यामुळे दारुड्याची प्रचंड गर्दी या दुकानांवर उसळली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना यांचा बोजवारा उडण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी व व तेथे ये दारू विक्रीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांची खातरजमा करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील दारु दुकानांवर चक्क प्राध्यापकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सर्वच्या सर्व प्राध्यापक संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन युवक या दारूविक्री च्या रांगेत प्राध्यापकांना आढळून येतात; मात्र ड्युटी म्हणून या शिक्षकांना त्याच विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करावा लागत आहे. संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीतच हा प्रकार घडावा, यापेक्षा दुर्दैव कोणते, असे अनेक व्यसनमुक्ती प्रचारकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सदर प्राध्यापकांना जाणीवपूर्वक दारूच्या दुकानावर ड्युटी देण्यात आलेली नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसार आम्ही शिक्षकांना रेशन दुकान वर इतर कर्मचाºयांना चेक पोस्टवर तर काही कर्मचाº्यांना इतर जबाबदारी दिली आहे. उर्वरित जे मनुष्यबळ उपलब्ध होते ते दारूच्या दुकानावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये प्राध्यापक आले आहेत; मात्र हे जाणीवपूर्वक घडलेले नाही. याचा मी पुन्हा आढावा घेतो.प्रदिप पवार, तहसीलदार, मुर्तीजापूर