संतोष येलकरअकोला, दि. 0१- डाटाबेस सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी ह्यई-फेरफार ह्यआज्ञावली वापराचे वेळापत्रक शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख संचालक कार्यालयाच्या २८ सप्टेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हय़ांचे सम तारखेत आणि १२ जिल्हय़ांतील ह्यई-फेरफारह्ण आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे. शासनामार्फत राज्यात ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ३५८ पैकी ३५७ तालुक्यातील सात-बाराची संगणकीकृत माहिती (डाटा )ऑनलाइन करून, फेरफार नोंदी घेण्यात येत आहेत. राज्यातील २ कोटी ४५ लाख सात-बाराची संगणकीकृत माहिती (डाटा) मुंबई येथील राज्य डाटा सेंटरमधील तीन डाटा सर्व्हरवर अपलोड करण्यात आला आहे. या माहितीचा वापर राज्यातील १२ हजार ६३७ तलाठी व २ हजार १0६ मंडळ अधिकारी करीत आहेत. सद्यस्थितीत ऑनलाइन माहितीमधील (डाटा) चुका दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन सर्व्हरचा वापर राज्यात एकाच वेळी करण्यात येत असल्याने डाटाबेस सर्व्हरवर ताण येत आहे. त्यामुळे ई-फेरफारच्या ऑनलाइन कामात अडचणी येत आहेत. या पृष्ठभूमीवर डाटाबेस सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी ई-फेरफार आज्ञावलीच्या वापराचे वेळापत्रक शासनाच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हय़ांचे काम सम तारखेत आणि १२ जिल्हय़ातील ई-फेरफार आज्ञावलीतील काम विषम तारखेत करण्यात येणार आहे. यासंबंधी शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.जिल्हानिहाय ई-फेरफार आज्ञावलीत कामाचे असे आहे वेळापत्रक!२,४,६ अशा सम तारखेस मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, बीड व परभणी इत्यादी २३ जिल्हय़ांत ई-फेरफार आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे. तसेच १,३,५ अशा विषम तारखेस कोल्हापूर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव व गोंदिया या १२ जिल्हय़ात ह्यई-फेरफारह्ण आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे.
‘सर्व्हर’वरील ताण कमी करण्यासाठी ‘ई-फेरफार’कामाचे वेळापत्रक!
By admin | Published: October 02, 2016 2:53 AM