अकोला : पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्हय़ात वॉटर कप स्पर्धेसाठी तीन तालुक्यांची निवड झाली असून, या तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अकोला येथील ह्यब्लू मॉरमॉनह्ण नेचर क्लबच्या सदस्यांनी कान्हेरी सरप येथे श्रमदानातून माती-नाला बांध बांधून या कार्यात आपले योगदान दिले आहे.निसर्गाचा समतोल कायम राहावा, यासाठी राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर भूमिका बजावणार्या ह्यब्लू मॉरमॉनह्ण नेचर क्लबच्या सदस्यांनी रविवारी सकाळच्या सत्रात कान्हेरी सरप येथे श्रमदान करून ग्रामस्थांच्या मदतीने माती-नाला बांधाची निर्मिती केली. या बांधामुळे येत्या पावसाळय़ात हजारो लीटर पाण्याचा संचय होऊन, भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी क्लबच्या सदस्यांनी ह्यजल है तो कल हैह्ण, ह्यएकच क्रांती जल क्रांतीह्ण अशा घोषणा देत मोठय़ा उत्साहाने श्रमदान केले. या अभियानात क्लबचे संस्थापक हरीश शर्मा, श्रीकांत पंडित, योगेश साहू, करण साहू, शुभम पाटील, गणेश चौरसिया, हर्षल अग्रवाल, तेजस्विनी रापर्तीवार, पूजा शाहू, पूजा पांडे, अंजली शुक्ला व श्रद्धा शुक्ला यांनी सहभाग नोंदविला.
‘ब्लू मॉरमॉन’ नेचर क्लबने बांधला माती-नाला बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2017 1:57 PM