लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकमत बाल विकास मंच व प्रा. सागर चौथेंच्या साम अँकेडमीतर्फे आयोजित स्थानिक साईकृपा मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित इको फेंडली गणेश कार्यशाळेला विद्यार्थ्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेस अकोल्यासोबतच पारस, अकोट, खामगाव, जानोरी येथून विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.सर्वप्रथम कार्यशाळा प्रशिक्षक प्रा. श्रीकांत चौथे, गणेश ठाकरे व आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. नंतर प्रशिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडू मातीपाूसन गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. जवळपास तीन तास चिमुकल्यांनी आपले आवडते बाप्पा साकारले. स्वत:च्या हातून बनविलेल्या मूर्तीचा आनंद विद्यार्थ्यांच्या भावमुद्रेतून ओसंडून वाहत होता. प्रा. सागर चौथे यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेकरिता आशिष चौथे, प्रमोद गिते शशिकांत शिरभाते, बाळू कवर, सोनाली इंगोले, वर्षा गिते, शिल्पा पाथरकर, रेणूका धानखडे आदींचे सहकार्य लाभले. -
बाल शिल्पकारांनी साकारले इको फ्रेंडली गणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:32 AM
अकोला : लोकमत बाल विकास मंच व प्रा. सागर चौथेंच्या साम अँकेडमीतर्फे आयोजित स्थानिक साईकृपा मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित इको फेंडली गणेश कार्यशाळेला विद्यार्थ्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेस अकोल्यासोबतच पारस, अकोट, खामगाव, जानोरी येथून विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.
ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच व साम अँकेडमीच्या कार्यशाळेत